IMPACT: पालघर डहाणू तालुक्यातील कासा चारोटी बँकेसमोर पोलीस बंदोबस्त

0
407

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना डहाणू तालुक्यातील कासा चारोटी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर लोक गर्दी करत असल्याची बातमी मुंबई ई न्यूजने दिली होती. बँकेच्या बाहेर लोकांच्या मोठ्या रांगा लागत असून सोशल डिस्टेसिंगचा नियम देखील पाळण्यात येत नव्हता. गर्दी झाल्यामुळे लोक बँक कर्मचाऱ्यांचं देखील ऐकत नव्हते.

मुंबई ई न्यूजच्या बातमीची दखल घेत पोलीस प्रशासनाने त्याठिकाणी बंदोबस्त लावला असून रांगेतील लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्यास लावले जात आहे. बँकेकडून देखील आलेल्या ग्राहकाला हॅन्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनच बँकेत प्रवेश दिला जातो आहे. मुंबई ई न्यूजच्या माध्यमातून आम्ही वारंवार वाचकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here