पालघर – योगेश चांदेकर :
आज कुंभवली-एकलारे ग्रामपंचायत येथील सरपंच रुपाली रमाकांत पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृह व गावातील इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये रस्ता रुंदीकरण, नवीन नळ योजना, विजेचे नवीन पोल, शाळा डिजिटल करणेसाठी संगणक आणि प्रोजेक्टर व इतर विकास कामांचा शुभारंभ झाला.

कार्यक्षम सरपंच रुपाली पिंपळे यांनी विशेष प्रयत्न करून व सातत्याने पाठपुरावा करून या योजनांसाठी निधी खेचून आणण्यात यश मिळवले. यातील काही विकास कामाचा शुभारंभ झाला असून काही कामे पूर्ण झाली आहेत. यावेळी बोलताना रुपाली पिंपळे यांनी या पुढेही गावच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार अशी ग्वाही दिली. याबरोबरच खासदार राजेंद्र गावित यांनी बोलताना रुपाली पिंपळे यांच्या कामाचं व होणाऱ्या गावच्या विकासाच विशेष कौतुक केलं.

सदर कार्यक्रमास खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, सभापती मनीषा पिंपळे, जिल्हापरिषद सदस्य सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र मेर, सुशील चुरी, मुकेश पाटील तसेच शिवसेना बोईसर विधानसभा क्षेत्र प्रमुख निलम संखे, शिवसेना पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, शिवसेना पालघर शहर प्रमुख भूषण संखे, युवासेना उपजिल्हाधिकारी सुमित पिंपळे, कुंभवली ग्रामविकास मंडळाचे अधक्ष्य महादेव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ह.ल.संखे पंचकोशीतील सर्व सरपंच व कुंभवली गावातील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर कार्यक्रम कुंभवली ग्रामपंचायत उपसरपंच राहूल गंगाधर संखे, ग्रामसेवक परेश संखे, संदिप गजानन संखे, प्राजक्ता सुनिल संखे, प्राची प्रल्हाद संखे, सुनंदा राजेंद्र संखे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्या प्रयत्नाने सोहळा पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here