MUMBAI e NEWS –
पालघर-योगेश चांदेकर :
पालघर जिल्यातील ग्रामपंचायत दापोली येथे विविध विकास कामांपैकी एक असणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आज करण्यात आले. शासनाच्या ३०५४ योजने अंतर्गत मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण अंदाजित ११६७००० एवढी रक्कम या कामासाठी मंजूर झाली असून हा रस्ता १७५ मिटर लांब आहे. सरपंच संखे यांनी प्रयत्न करून विविध कामांचा निधी खेचून आणला त्यापैकी एका कामाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमामध्ये वैभव संखे यांनी बोलताना सरपंचाच्या कामाचे विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कामाचे उद्घाटन करण्यासाठी पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, नवनिर्वाचित प. स. सदस्या शैला भरत कोळेकर, सरपंच मनस्वी मनोज संखे उपसरपंच हेमंत संखे, उपशाखा प्रमुख वसंत संखे, संदीप संखे, ग्रामपंचायत सदस्य व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.