पालघर: डहाणू समुद्र किनारी आला जखमी डॉल्फिन प्रजातीचा मासा..!

0
367

पालघर – योगेश चांदेकर:

डहाणू जवळील घोलवड येथील समुद्र किनारी डॉल्फिन प्रजातीचा मासा जखमी अवस्थेत आढळून आला आहे. पहाटे काही मच्छीमारांना हा जखमी मासा दिसून आला असून याची लांबी साधारणतः आठ ते दहा फूट आहे. सदर मासा समुद्रातील भरतीच्या पाण्यासोबत वाहून आला असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली आहे. या माशाला सध्या जवळील पाण्यात सुखरूप ठेवण्यात आलं असून पुन्हा भरती आल्यावर त्याला समुद्रात सोडलं जाणार आहे.

दरम्यान कालच डहाणू समुद्र किनाऱ्यावर मृत बलिन व्हेल म्हणजेच देवमासा वाहून आल्याची घटना घडली होती. मासेमारीच्या कारणामुळे तसेच प्रदूषणामुळे तर सागरी प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे का अशी शंका निर्माण होते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here