पालघर : …यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध; असा करा अर्ज..!

0
452

पालघर – योगेश चांदेकर :
पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कामगार आपल्या राज्यात परत स्थलांतरीत झाले आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा मार्फत बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याची सुवर्णसंधी पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कामगार आपल्या राज्यात परत स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सुरु झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समिती पालघर जिल्हा यांच्या सुचनेनुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर या कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, पालघर जिल्ह्यातील नामांकित आस्थापना/कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्त पदांव्दारे मोठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे.

नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या भागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आपली आधार लिंक नाव नोंदणी करावी, त्यामध्ये अद्यावत मोबाईल नं. ई-मेल व शैक्षणिक पात्रता तसेच अनुभवाची नोंद करावी व ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली असेल त्यांनी वरील गोष्टी अद्यावत कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापनांवरील रिक्त असलेल्या जागांवर नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. या ऑनलाईन मेळाव्यांतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे ITI Turner, Fitter, Welder come Fitter, Helper, Electrical, Refrigeration, Mechanical, Items Machinist, microbiology, B.Sc chemistry, QC Microbiologist Officer, CNC Operator Chemist Pharmacist या पदासाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच इ. B.Pharm. M.Pharm, B.Sc Chemistry. M.Sc Diploma/Degree in Mechanical उमेदवारांसाठी 1200 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सदरच्या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबासाईटवर नोंदवीलेल्या रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड ने लॉगीन करावे व पंडित दिनदयाल उपादध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करुन पालघर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला अप्लाय करावे (Employment->.Job seeker-> jobseeker login with Registration no. & Password -> Pandit Dindayal Upadhyay Job Fair->District Palghar->(View Job Fair Details)Vacancy Listing (View Company Vacancies) -> Click on I Agree ->Apply for suitable Vacancies)

सदर मेळाव्यामध्ये उमेदवार एकापेक्षा जास्त कंपर्नीचा पर्याय निवडू शकतो, ऑनलाईन सहभागी असलेल्या कंपनीला वरील पध्दतीने पसंतीक्रमानुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे किंवा ई-मेल व्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक व युवतींनी दिनांक 04 जूलै 2020 पर्यंत अर्ज करावे. तसेच स्वत: बद्दलची माहिती संबंधित वेब पोर्टलवर अद्ययावत करताना काही अडचण उद्भवल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र.7058435714 किंवा या कार्यालयाचे ई-मेल-palgharrojgar@gmail.com वर संपर्क साधावा आणि या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here