पालघर-योगेश चांदेकर :

पालघर- १० ते १२ जानेवारी रोजी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ केळवे तर्फे केळवे प्रिमियर लिग २०२० चे आयोजन करण्यात आले. या लीगमध्ये केळव्यातील एकूण १२ संघमालकांनी संघ खरेदी केले होते. केळवे गावातील २०४ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन केळव्याच्या सरपंच भावना किणी यांच्या हस्ते करण्यात आले. नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्या भारती सावे यांच्या हस्ते सर्व संघमालकांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सलग तीन दिवस प्रत्येकी आठ षटकांचे सामने खेळल्या गेलेल्या या लीगमध्ये मध्ये अनेक रशीचे सामने पहावयास मिळाले. षटकारांची आतिषबाजी, गोलंदाजी चा भेदक मारा आणि चपळ क्षेत्ररक्षण पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहिला. प्रत्येक सामन्यागणीक प्रेक्षकांचा आनंद आणि उत्साह वाढताना दिसला.


या लीगमध्ये संघमालक दर्शन मेहेर यांच्या जलसारंग नाखवा संघाने विजेतेपद पटकावले तर जयदीप पाटील यांच्या पाटील सेना संघाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेतील उत्तम कामगिरी मुळे पाटील सेनेच्या चेतन बारी यांना मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. या संपूर्ण
लिगसाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.

या लीगच्या बक्षिस समारंभासाठी माजी रणजीपटू राजेश सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच
मुंबई महिला संघातील क्रिकेटपटू सानिया राऊत या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. स्पोर्टस असोसिएशन केळवेचे अध्यक्ष भूषण सावे व त्यांचे सहकाऱ्यांनी या सदर भव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here