कानातील मळ काढताय तर मग हे वाचाचं.. अन्यथा होईल मोठा त्रास!

0
1317

मुंबई ई न्यूज वेब टीम:

कानात असणारा मळ हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचाच असतो. कानात जी मळ जमते ती मळ असणे अत्यंत गरजेचं असते. हि मळ बाहेरील हवा, धूळ, बाहेरची ध्वनी अडवण्याचे महत्वाचे काम करत असते. असे असले तरी प्रमाणापेक्षा जास्त मळ जमा झाल्यास त्याचा त्रास होतो. त्यामुळे कान गच्च होऊ नये यासाठी मळ साफ करणे देखील गरजेचं असते. आपले कान नाक तोंड हे एका छोट्या नलिकेद्वारे जोडले गेलेले असतात त्यामुळे कानातील मळ जास्त प्रमाणात वाढल्यास चिडचिड होणे, लक्ष न लागणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ होणे हे त्रास होऊ शकतात. त्यामुळे जास्तीची मळ आपण महिन्यातून १-२ वेळा काढायला पाहिजे असं काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र ही मळ साफ करताना पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा कानाच्या बाबतीत इतर समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

  • कान हा अवयव देखील डोळ्यांइतकाच नाजूक आहे. त्यामुळे कानाची स्वच्छता करण्यासाठी, सेफ्टी पिन, पिन अशा टोकदार अथवा टोक असणाऱ्या वस्तूचा वापर केल्यास कानामध्ये जखम होऊ शकते.
  • कान साफ करण्यासाठी जर ईअरबड्स वापरत असाल तर त्या खूप खोलवर जाणार नाहीत याची काळजी घ्या. त्यामुळे कानातील मळ बाहेर येण्याऐवजी आतमध्ये सरकून कानाच्या पडद्याला चिटकली जाऊ शकते.
  • कानातील मळ काढण्यासाठी कानात लिंबाचा रस टाकू नये यामुळे कानात जखम झाली असल्यास इन्फेक्शन होण्याची भीती असते.
  • मळ काढण्यासाठी जर कानात हळद, दूध अशा गोष्टींचा वापर करत असाल तर तो टाळावा. त्यामुळे कानात बुरशी तयार होण्याचा संभव असतो.

त्यामुळे कानातील मळ काढत असताना योग्य ती खबरदारी घ्या. घरच्या घरी मळ साफ करण्याऐवजी जर कान-नाक-घसा तज्ञ डॉक्टरांना दाखवून ३-४ महिन्यांतून एकदा मळ साफ केल्यास कानाचे आरोग्य उत्तम राहते.

हि माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीं, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तसेच याव्यतिरिक्त इतर कोणत्याही शंकांसाठी Leave a Comment द्वारे आपली प्रतिक्रिया कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here