पालघर: त्या १० कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या २०१ जणांना केले क्वारंटाईन..!

0
388

पालघर – योगेश चांदेकर:

गंजाड येथील ३ वर्षीय मुलीच्या संपर्कात आल्याने विलगीकरण करून चाचणी करण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कासा येथील दोन डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या १७६ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर पालघर तालुक्यातील त्या ८ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या भागातील २५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. डहाणू येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या १७६ जणांमध्ये हॉस्पिटल कर्मचारी, उपचारासाठी दाखल रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. हॉस्पिटल कर्मचारी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे त्यांच्या प्रवास इतिहासावरून ट्रेसिंग सुरु आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्या लोकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत डहाणू व पालघर तालुक्यात एकूण ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान कासा गावात खळबळ माजली असून भीती चे वातावरण झाले आहे. सदर घटनेची दखल घेत प्रांत अधिकारी सौरभ कटियार यांनी आशा, अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शन करून सर्वे चालू केला आहे. तसेच गाव पूर्ण पणे बंद ठेऊन अत्यावश्यक सेवा घरपोच मिळाव्यात अशाप्रकारची उपाययोजना प्रशासनातर्फे चालू करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कासा गाव व परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचे आदेश कासा ग्रामपंचायतीला दिले आहेत सोबत एक कंट्रोल रूम देखील चालू करण्याचे ठरविले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व स्टाफ यांना जव्हार विलगीकरण कक्षात हलविण्यात येणार आहे अशी महिती प्रांत अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे.

“उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व स्टाफ यांना जव्हार विलगीकरण कक्षात हलविण्यात येणार आहे. त्या दोन कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या १७६ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्टाफच्या नातेवाईकांना व रुग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.” – संदीप गाढेकर, तालूका आरोग्य अधिकारी डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here