पालघर-योगेश चांदेकर:

पालघर- १० मार्च रोजी पहाटे ६ च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्ग ओलांडताना डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी नजीक धानिवरी येथे कारची धडक लागून अपघातात ३ वर्षाच्या बिबट्या ठार झाल्याची दुसरी घटना घडली आहे.वन खात्याकडुन मृत बिबट्याला कासा वन परिक्षेत्र कार्यालयाजवळ शवविच्छेदन करुन जाळण्यात आले.यावेळी सहाय्यक वनसंरक्षक राहुल मराठे तसेच कासा वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश पाटील उपस्थित होते.अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला अाहे.

मंगळवारी पहाटे ६ च्या सुमारास उधवा वन परिक्षेत्र अंतर्गत धानीवरी रेंजमध्ये मुंबई अहमदाबाद महमार्गावरील गुजरात वाहीनीवर अज्ञात वाहनचालकाने बिबट्याला धडक दिली. या अपघातात बिबट्याला रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला. ही माहिती वन खात्याला कळवण्यात ‍अाल्यानंतर मृत बिबट्याला कासा वन परिक्षेत्र कार्यालयाजवळ आणून कासा येथे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.
यापुर्वी २० फेब्रूवारी २०१९ रोजी धानीवरी येथे ५ वर्षाचा बिबट्या ठार झाला होता.तर २९ जानेवारी २०१८ रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उपलाट गावाजवळ महामार्गावर धडक लागून मादी बिबट्याचा मृत्यू झाला होता.

तर वर्षभरात डहाणू विभागात मानवी वस्तीत शिरलेले वेगवेगळ्या ठिकाणाहून ५ बिबट्यांना वन विभागाने जेरबंद केले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग अोलांडताना तीन वर्षात ३ बिबट्यांना वाहन अपघाताचे बळी जावे लागत असल्याने वन्य मित्रांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

सन २०१८ मध्ये डहाणू तालुक्यातील सोगवे ( फाशात अडकून) बोईसर – पाचमार्ग ,आच्छाड,कैनाड ( गवताच्या गोडाऊन मध्ये)या चार ठीकानी जेरबंद झाला. सोगवे आणि बोईसर येथे स्थानिकांनी लावलेल्या शिकारीच्या फाशात सापडला.२०१९ मध्ये सातपाटी येथून बिबट्या जेरबंद केला. का२९ जानेवारी २०१८ रोजी महामार्गावर अपघातात एका बिबट्या ठार झाला होता.महामार्गावरील वाहतूक वन्यप्राण्यांच्या जीवांवर आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तलासरी तालुक्यातील आमगाव ठाकर पाडा येथे मादी बिबट्या १५ ऑगस्ट २०१६ रोजी सर्व प्रथम आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या ठाकरपाडा वसंत इरिम (३६ )यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.बिबट्याचा हल्ल्यात वसंत इरिम यांस प्राण गमवावे लागले. तिचे बछडे व बिबटेे वन विभाग पकडू शकले नाही.

“बिबट्या हा पर्यावरणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे.त्य‍ाल‍‍ा टिकवण्यासाठी माणसांनी जंगलाच्या कायद्याचे पालन केले पाहिजे .” धवल कंसारा अध्यक्ष
वाईल्ड कन्झरवेशन अॅण्ड अॅनिमल वेलफेअर असोसिएशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here