कोल्हापूर ब्रेकींगः सीपीआरमध्ये कोरोना कक्षातील संशयिताचा मृत्यु

0
405

कोल्हापूर। कोल्हापूरातील सीपीआर मध्ये कोरोनासंशयित ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला आहे. हा रूग्ण सीपीआर मधील कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र अद्याप त्याचा रिपोर्ट प्रलंबित असल्याचे सीपीआर अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांनी सांगितले आहे. 

  • कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित ३ रूग्ण आढळले आहेत. इस्लामपूरमधील कुटूंबियांच्या संपर्कात आलेली पेठवडगावची महिला आणि कोल्हापूर शहरातील दांपत्य असे एकूण ३ रूग्ण आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तरच कोरोना सारख्या महामारीला आटोक्यात आणणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here