पालघर – योगेश चांदेकर :
पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून दिवसभरात जिल्ह्यामध्ये कोरोनाचे तब्बल ३०८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ९ हजार ३४९ वर पोहचला आहे. तर आजवर १७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्याच्या विविध रुग्णालयांमध्ये 2 हजार 514 कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तर 6 हजार 657 कोरोनाबाधित रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.

मृत्युदर आणखी कमी करणार : डॉ. कैलास शिंदे

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. मृत्युदरही एक टक्का इतका आहे. हा मृत्युदर ‘मिशन-चेस द व्हायरस’द्वारे एक टक्क्याच्या खाली आणणे शक्य होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेद्वारे तीन हजार अ‍ॅण्टिजन किट मिळाले असून १० हजार किट जिल्हा प्रशासन विकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संशयित रुग्णांची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याआधारे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील जास्तीतजास्त संशयित रु ग्णांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. डहाणू येथे सुरू असलेल्या लॅबमध्ये रोज ५०० चाचण्या करण्यासाठी आॅटो आरटीपीसीआर मशीनचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच वेदान्त महाविद्यालयात लॅब सुरू करण्यासाठी विनंती केली आहे. तसेच ग्रामीण

रुग्णालय वाडा येथे ‘ट्रूनॅट’ मशीनच्या माध्यमातून दररोज ५० रुग्णांची तपासणी करण्याची सुविधा मिळणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाभरातील सर्व आशा वर्कर्सना प्लस आॅक्सिमीटर देण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here