पालघर: जि. प. अध्यक्षा कामडींच्या विनंतीला यश; कोटा येथे अडकलेले विद्यार्थी लवकरच येणार घरी!

0
411

पालघर – योगेश चांदेकर:

राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्राचे दोन हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी लॉक डाऊन मुळे अडकले आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वच विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्याची विनंती जि. प. अध्यक्षा भारती कामडी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश असून या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी राज्य सरकारने १०० बसेसची सोय केली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी येत्या काही दिवसातच आपापल्या घरी परततील.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी येत्या दोन दिवसांत एमएसआरटीसीच्या बसेस कोटा येथे रवाना करण्यात येणार असल्याचे सांगितले. इयत्ता बारावीनंतर विविध प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग क्लाससाठी देशभरातील अनेक विद्यार्थी कोटा येथे जातात. महाराष्ट्रातील विद्यार्थी ज्या ठिकाणी गेले आहेत. अनिल परब पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र सरकारने कोटा येथे गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही यासाठी धुळे येथून कोटाला जाण्यासाठी सुमारे १०० बसेस पाठवणार आहोत. या विद्यार्थ्यांना आधी धुळे जिल्ह्यात आणले जाईल. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here