पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्र बेरिस्ते येथील नजीकच्या नदी जवळील विहिरीतून सुरु असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षितच असून ती आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही, परिणामी गावाला दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाला टँकर द्वारे पाणीपुरवठा करणेचे आदेश द्यावे लागतात, यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी शासन स्तरावरून खर्च होऊन तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची गरज भागवली जाते. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

गावातील महिलांना टँकरने विहिरीत टाकलेले पाणी डोक्यावरून घरापर्यंत आणावे लागत आहे. या आदिवासी भागात शासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती आहे. बेरिस्ते मधील सदरची पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने आजपर्यंत ताब्यात का घेतली नाही? ती पूर्ण होणेस का विलंब झालेला आहे? या योजनेमध्ये काही आर्थिक देवाण घेवाण असा व्यवहार झाला आहे का? टँकर माफियांच्या फायद्यासाठी तर योजना रखडली नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न गावातील नागरिकांच्या मनात आहेत.

दरम्यान ही योजना मृतअवस्थेत असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी विहरीवरून पायपीट करावी लागते. पाणी आणावयास जाताना सोबत लहान मुलं देखील येतात, त्यामुळे दुर्दैवाने एखादी अपघाती घटना झाल्यास त्यास कोण जबाबदार असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांनी मुंबई ई न्यूजला बोलून दाखवला. एखादी दुर्घटना घडल्यास ग्रामपंचात, ग्रामसेवक व पंचायत समिती पदाधिकारी यांना जबाबदार धरणार असल्याचं सांगत संतप्त ग्रामस्थांनी आपली खदखद व्यक्त केली.

साधारणतः ६७ लाख रुपये इतका खर्च या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे जर इतका खर्च करून देखील पाण्यासाठीची वणवण थांबत नसेल तर हि योजना म्हणजे केवळ मलिदा लाटण्यासाठी केलेला खटाटोप तर नाही ना अशी शंका उपस्थित होते आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देत सदर पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित कशी करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. सोबतच जर हि योजना केवळ कागदावरच पूर्णत्वास नेण्यात अली असेल तर संबंधित व्यक्तींची चौकशी करून त्यांना कठोर शासन करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

याबरोबरच गोमघर व चास या गावांची नळ पाणी पुरवठा योजना ही कामे अर्धवट अवस्थेत प्रशासनाकडूनच काम बंद करण्यात आली आहेत. तरी सदर योजना सुरु करण्यात यावी. गोमघर व चास योजना लवकर पूर्ण करण्याबाबत अनेक वेळा सबंधीत विभागाकडे लेखी व तोंडी मागणी केली. तसेच आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. तरी सदरील काम हे अर्धवट पध्दतीने बंद करुन येथील गावांना पाणी टंचाई कृत्रिम पध्दतीने केली गेली आहे. त्यामुळे सबंधीत जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती पंचायत समिती मोखाडा सदस्य प्रदीप वाघ यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्र बेरिस्ते येथील नजीकच्या नदी जवळील विहिरीतून सुरु असलेली पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षितच असून ती आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही, परिणामी गावाला दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाला टँकर द्वारे पाणीपुरवठा करणेचे आदेश द्यावे लागतात, यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी शासन स्तरावरून खर्च होऊन तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची गरज भागवली जाते. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

गावातील महिलांना टँकरने विहिरीत टाकलेले पाणी डोक्यावरून घरापर्यंत आणावे लागत आहे. या आदिवासी भागात शासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती आहे. बेरिस्ते मधील सदरची पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने आजपर्यंत ताब्यात का घेतली नाही? ती पूर्ण होणेस का विलंब झालेला आहे? या योजनेमध्ये काही आर्थिक देवाण घेवाण असा व्यवहार झाला आहे का? टँकर माफियांच्या फायद्यासाठी तर योजना रखडली नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न गावातील नागरिकांच्या मनात आहेत.

दरम्यान ही योजना मृतअवस्थेत असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी विहरीवरून पायपीट करावी लागते. पाणी आणावयास जाताना सोबत लहान मुलं देखील येतात, त्यामुळे दुर्दैवाने एखादी अपघाती घटना झाल्यास त्यास कोण जबाबदार असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांनी मुंबई ई न्यूजला बोलून दाखवला. एखादी दुर्घटना घडल्यास ग्रामपंचात, ग्रामसेवक व पंचायत समिती पदाधिकारी यांना जबाबदार धरणार असल्याचं सांगत संतप्त ग्रामस्थांनी आपली खदखद व्यक्त केली.

साधारणतः ६७ लाख रुपये इतका खर्च या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे जर इतका खर्च करून देखील पाण्यासाठीची वणवण थांबत नसेल तर हि योजना म्हणजे केवळ मलिदा लाटण्यासाठी केलेला खटाटोप तर नाही ना अशी शंका उपस्थित होते आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देत सदर पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित कशी करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. सोबतच जर हि योजना केवळ कागदावरच पूर्णत्वास नेण्यात अली असेल तर संबंधित व्यक्तींची चौकशी करून त्यांना कठोर शासन करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

याबरोबरच गोमघर व चास या गावांची नळ पाणी पुरवठा योजना ही कामे अर्धवट अवस्थेत प्रशासनाकडूनच काम बंद करण्यात आली आहेत. तरी सदर योजना सुरु करण्यात यावी. गोमघर व चास योजना लवकर पूर्ण करण्याबाबत अनेक वेळा सबंधीत विभागाकडे लेखी व तोंडी मागणी केली. तसेच आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. तरी सदरील काम हे अर्धवट पध्दतीने बंद करुन येथील गावांना पाणी टंचाई कृत्रिम पध्दतीने केली गेली आहे. त्यामुळे सबंधीत जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी. – प्रदीप वाघ (पंचायत समिती मोखाडा सदस्य) .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here