पालघर-योगेश चांदेकर
आज १५ फेब्रुवारीला तलासरी पंचायत समितीच्या सभापतीपदी कॉ. नंदू हाडळ आणि उपसभापतीपदी कॉ. राजेश खरपडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांच्यासोबत आमदार कॉ. विनोद निकोले हे देखील उपस्थित होते.

७ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत माकपने तलासरी तालुक्यातील पंचायत समितीच्या १० पैकी ८ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ४ जागा जिंकल्या आहेत. पालघर जिल्ह्यात माकपने पंचायत समित्यांच्या १२ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ६ जागा अशा एकूण १८ जागा जिंकल्या आहेत. २०१५च्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाच्या ३ जागा वाढल्या आहेत. तलासरी पंचायत समितीवर १९६२ पासून सलग ५८ वर्षे लाल बावटा फडकत आहे.