मुंबई-योगेश चांदेकर :

व्हेलेंटाईन वीकला आठवडा उलटला असतानाच आता पुन्हा प्रेमात आकंठ बुडण्यासाठी साईक्षा फिल्म्स अँड क्रिएशन प्रस्तुत “बेधुंद” हे मराठी रोमँटिक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. रोहितराज तुकाराम कांबळे प्रथमच दिग्दर्शक करत असून, प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आणि गायक हर्षवर्धन वावरे यांनी हे गाणं उत्कृष्टरित्या गायले असून, याचे रेकॉर्डिंग ठाण्याच्या सीएनएम म्युझिक फॅक्टरी या स्टुडिओमध्ये पार पडले. या गाण्याची विशेषता म्हणजे संपूर्ण तरुण टीम यासाठी काम करत असून, हे गाणे एकूण प्रेमात पुन्हा बेधुंद होता येणार आहे.

भक्ती गीतांसह हिंदी आणि मराठीत ‘तू जिथे मी तिथे’, मन हे बावरे, सख्या रे साजना, अशी एकाहून अनेक भन्नाट गाणी गाणारी प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल व ‘धागा धागा’, ‘सिंपल’, ‘रोज मला विसरून मी’, ‘गरा गरा’ अशी प्रेमाची गाणी गाणारा गायक हर्षवर्धन वावरे, या दोघांच्या जोडीने प्रथमच एकत्र रोमँटिक गाणं गायले आहे.‘बेधुंद मी बेधुंद तू’ असे या गाण्यांचे बोल असून दोघांनीही उत्कृष्ट गायन केले आहे. दरम्यान नेहा आणि हर्षवर्धनच्या आवाजातील ‘बेधुंद’ हे रोमँटिक गाणं मराठी चित्रपट सृष्टीला व्हेलेंटाईन वीकनंतर पुन्हा प्रेमात ‘बेधुंद’ होण्यास भाग पाडणार आहे.साईक्षा फिल्म अँड क्रिएशन प्रस्तुत ‘बेधुंद’ हे गाणे आहे. या गाण्याचे निर्माते डी. संजयकिरण आहे. तर अविष्कार विश्वासराव यांचे संगीत आणि गीत रोहितराज तुकाराम कांबळे यांचे स्वतःचेच आहेत.

या अल्बम संदर्भात बोलताना गायिका नेहा राजपाल हिने सांगितले की, गायक हर्षवर्धन वावरे सोबत प्रथमच हा अल्बम करतेय. बेधुंद हे प्रेमावर आधारित गाणं आहे. प्रेमाच्या अशा फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्ड होत असल्याने गाणं गाताना एक वेगळीच मजा आली आहे. त्यामुळे हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल.

गायक हर्षवर्धन वावरे या संदर्भात म्हणाला की, गायिका नेहा राजपाल सोबत हा अल्बम गाण्याची संधी मिळतेय याचा मला खूप आनंद होतोय की, मी प्रथमच तिच्यासोबत गात आहे. तसेच रोहितचेही कौतुक त्याने अगदी कमी वयात इतक सर्व प्रोडक्शन जमून आणलय.

व्हेलेंटाईन वीक नुकताच सर्वानीच साजरा केला. या निमित्तानेच आम्ही प्रेमावर आधारित अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण केले. या अल्बममध्ये गायक हर्षवर्धन वावरे, नेहा राजपाल यांनी उत्कृष्ट गायले आहे असे निर्माता डी.संजयकिरण यांनी सांगितले.

साईक्षा फिल्म अँड क्रिएशन प्रस्तुत हे गाणे आहे. नवीन तरुण पिढीसाठी लवकरच आम्ही ‘बेधुंद’ हे अल्बम घेऊन येत आहोत, असे दिग्दर्शक रोहितराज तुकाराम कांबळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here