पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य ओळखून देशातील सर्वच उद्योगपती शक्य ती सर्व मदत करत आहेत. या मदतीमध्ये आघाडीवर आहेत टाटा समूहाचे रतन टाटा. रतन टाटा यांनी आत्तापर्यंत १५०० कोटी रुपये प्रधानमंत्री राहत कक्षाला दिले आहेत. सोशल मीडियावर रतन टाटा यांचे आभार मानात अनेकांनी ते सच्चे भारतरत्न असल्याचे मत व्यक्त केलं आहे. अशातच पालघरमधील अनिल खजूरे या युवकाने रतन टाटांना दया अर्ज लिहून टाटास्काय सर्व्हिस ३ महिन्यांसाठी मोफत देण्याविषयी विनंती केली आहे. [Letter to Ratan Tata for 3 months free Tatasky Dish service during corona virus situation]
सरकारने कोरोनाचा समूह संसर्ग होऊ नये यासाठी देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. लोकांना लॉक डाऊन काळात मनोरंजन सुविधा मोफत मिळाल्यास त्यांना घरात राहणे सोप्पे जाईल असा उद्देश या तरुणाने आपल्या पत्रात व्यक्त केला आहे. तरुणाचा हा दया अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा दया अर्ज रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचतो का आणि यावर ते काय निर्णय घेणार यावर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगत आहे?