मुंबई – योगेश चांदेकर :
राज्यात लॉकडाऊन ४ ची घोषणा करण्य़ात आली आहे. कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सरकार आत्तापर्यंत तीन वेळा लॉकडाऊन वाढवला आहे. त्यानंतर आज तिसऱ्या लॉकडाऊन ची मुदत संपत आहे. त्यानंतर आज चौथ्य़ा लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे.
आज दिवसभरात केंद्र सरकारकडून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची केव्हाही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनला मुदतवाढ दिली असली तरी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची नियमावली अद्याप जारी केलेली नाही. केंद्र सरकार लॉकडाऊन-४ साठी कोणती नियमावली जारी करते, ती पाहूनच राज्यातील नियमावलीही तयार केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान लॉकडाऊन 4 हे लॉकडाऊन 3 पेक्षा वेगळं असणार आहे. लॉकडाऊन 4 मध्ये अनेक उद्योग सुरु होऊ शकतात. सध्या राज्यसरकार “केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.