पालघर-योगेश चांदेकर
डहाणू- डहाणू पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाची निवडणुक शनिवारी पंचायत समिती हाॅल येथे पार पडली. यावेळी डहाणू पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहलता सातवी तर उपसभापतीपदी शिवसेनेचे पिंटू गहला यांची निवड झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या सभापती पदाच्या उमेदवार स्नेहलता सातवी यांना १९ मते मिळवुन विजयी झाल्या तर उपसभापती पदाचे शिवसेनेचे उमेदवार पिंटु गहला 19 मते मिळवुन विजयी झाले. तर भाजपाच्या सभापती उपसभापती यांना केवल सात सात मते पडून ते पराभूत झाले. सभापती पदाच्या निवडणुकीस राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, माकप एकत्र राहीले. मात्र भाजपाने याविरोधात सभापतीपदाचा उमेदवार उभा केला होता.परंतु त्यांना केवळ सात सात मते पडुन ते पराभूत झाले. पीठासीन अधिकारी म्हणून डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार राहुल सारंग, गट विकास अधिकारी बी एच भरक्षे उपस्थित होते.

डहाणू पंचायत समितीच्या एकुण १६ जगांवर निवडणुक झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक ९ जागा, शिवसेना ८ जागा, भाजप ७ जागा, माकप २ जागा असे बलाबल राहीले.
यावेळी राष्ट्रवादीचे राजेश पारेख, तालुका अध्यक्ष काशीनाथ चाैधरी, रफिक घाची, शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा, जिल्हा उप प्रमुख संतोष शेटी, अमित चुरी,तन्मय बारी, चिंचणी चे सरपंच कल्पेश धोडी, नितेश दुबला यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.