पालघर: त्या तिघांच्या हत्येची उच्च स्तरीय चौकशी करा – देवेंद्र फडणवीस

0
419

पालघर – योगेश चांदेकर:
पालघरमधील गडचिंचले येथे जमावाकडून तिघांची हत्या झाल्याची घटना धक्कादायक आणि अमानवी आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून घटनेला कारणीभूत असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरे सरकारकडे आज केली आहे.

अफवांमुळे कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायवन गडचिंचले रोडवर धक्कादायक प्रकार घडला असून तीन प्रवाशांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री गडचिंचले येथे इकोने प्रवास करणाऱ्या तीन प्रवाश्यांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती.

त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्या करतेवेळी जमावात असलेले काही आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here