पालघर: पोलीसांची धडक कारवाई; ७५ गोणी काळा गूळ, ४ गोणी नवसागर जप्त

0
445

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या दरम्यान मनोर पोलीसांनी धडक कारवाई करत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या काळ्या गुळाचा मोठा साठा जप्त केला आहे. बुधवारी सकाळी महामार्गावरील कुडे या गावात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉक डाऊनच्या कालावधीत गावठी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळाच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कुडे पाटील पाड्यातील किराणा दुकानात काळा गूळ आणि नवसागर याचा मोठा साठा करण्यात आल्याची माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मनोर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रिजवाना काकेरी आणि त्यांच्या टीमने किराणा दुकान चालक रमाकांत पाटील यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये काळा गूळ आणि नवसागरचा मोठा साठा जप्त केला. यावेळी काळ्या गुळाचा ७५ गोणी आणि ४ गोणी नवसागर जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीवर मनोर पोलीस स्टेशन मध्ये प्रोहीबिशन ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here