पालघर-योगेश चांदेकर :

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित राष्ट्र सेवा समिती मार्फत एक कदम ग्रामीण रोजगार कि ओर या कार्यक्रमा अंतर्गत पालघर जिल्ह्यातील वनवासी (आदिवासी) महिलांना घर सांभाळून रोजगार मिळावा म्हणून बांबू पासून निरनिराळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मागील ९ वर्षांपासून देण्यात येत आहे .

याचाच एक भाग म्हणजे चालू वर्षी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले .४ मार्च २०२० संध्याकाळी ४ वाजता झालेल्या या समारोप कार्यक्रमाच्या वेळी. प्रमुख अथिति म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तसेच लेखक रमेश पतंगे , महाराष्ट्र मराठी शब्दकोशाचे अध्यक्ष तथा विवेक साप्ताहिकाचे प्रबंधक संपादक व समितीचे संचालक दिलीप करंबेळेकर, जिल्हा धिकारी डॉ कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे , मुंबई तरुण भारतचे संपादक तथा समितीचे संचालक किरण शेलार, संचालक प्रदीप गुप्ता व समितीचे संचालक मंडळ , विध्यार्थी,परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक यांच्या सह अनेक गणमान्य उपस्थित होते .

समितीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते मंत्रोच्चारात दीप प्रज्वलन करण्यात आले . पाहुण्याच्या स्वागतानंतर त्यानंतर पालघर तालुक्यातील हलोली बोट गावच्या महिला आदिवासी भगिनींनी पालघर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असलेलं वारली नृत्य म्हणजेच तारपा नृत्य सादर केले . यानंतर समितीच्या सरस्वती विद्यामंदिराच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व प्रकल्पाची माहिती समितीचे संचालक दिलीप करंबेळेकर यांनी केली . त्यानंतर बांबू हस्तकला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३६ महिलांचा राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला .

यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्र सेवा समितीच्या ग्राम विकास कार्याचा गौरव करताना देशात चाललेल्या देशविरोधक कृत्याचा समाचार घेतला तर सध्याच्या केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या माहिती सह गावासाठी व एकूणच देशासाठी गोवंश किती महत्वाचे आहे हे पटवून दिले .यावेळी विवेक पर्यावरण समितीचे कार्यवाह उमेश गुप्ता यांना राज्यपालांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मारक म्हणू उभारण्यात आलेल्या सैनिकी वनामध्ये लावण्यासाठी एका वृक्षाचे रोपटे दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई विध्यापीठचे प्राध्यापक मंदार भानुशे यांनी तर व्यवस्थापक लुकेश बंड यांनी आभार प्रदर्शन केले .
विवेक सेंटरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून महिला सक्षमीकरणा करिता पालघर जिल्हातील आदिवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा या हेतूने विवेक या संस्थेने पुढाकार घेतला असून अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांचाकडून पर्यावरण पूरक बांबू हस्तकलेच्या बहुउपयोगी निरनिराळ्या वस्तू तयार करण्यात येत आहेत .

वनवासी भागात सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूच्या आकर्षक वस्तू राष्ट्रपती व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ह्यांना पुणे येथील राजभवनात नुकत्याच भेटीदाखल देण्यात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रपतीनी बांबू हस्तकलेचे कौशल्य पाहून वनवासी भगिनींचे मोठे कौतुक केले होते . तसेच त्यांना हस्तकलेमार्फत रोजगार मिळवून दिल्याबद्धल विवेक सेंटरच्या कार्याचेही कौतुक केले होते .व पर्यावरणपूरक बांबू हस्तकलेच्या वनवासी भगिनींच्या मार्फत तयार करणाऱ्या वस्तूंचा अधिकाधिक उपयोग करून त्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहनही केले होते .


विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर नावाची सामाजिक संस्था मागील ९ वर्षांपासून वनवासी महिलांना रोजगार प्राप्ती व्हावी म्हणून पालघर जिल्ह्यात कार्य करत आहे . यामध्ये बांबू हस्तकलेचा समावेश असून प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत आहेत .त्यात ट्रे, आकाश कंदील,मोबाईल होल्डर, राख्या, फ्रुट बास्केट, पेपरवेट, टी कोस्टर इत्यादी सारख्या आकर्षक वस्तूंची निर्मिती होत आहे. सदर उत्पादने हि उच्चं प्रतीची व दर्जेदार असल्याने त्यांना मागणीही भरपूर आहे. तसेच एमेजन ह्या ऑनलाइन विक्री पोर्टल वर विवेक बांबू हॅन्डीक्राफ्ट ह्या नावाने सुधा वस्तु उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here