भाईंदर-योगेश चांदेकर :
मिरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना व आदिवासी पाडयांना नागरी सुविधा व कामगारांना त्यांचे हक्क न देणाऱ्या महानगरपालिके विरोधात श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वरणा यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी व बंचित नागरीक आणि कामगार पोलीसांचा बंदी हुकूम झुगारून मिरा- भाईदर महानगरपालिकेवर धडकला. “२०२२ मध्ये देशाच्या स्वातंञ्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतांना राज्यातील आदीवासी व गरिबांचे, कामगारांचे मुलभूत प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. अनेकांना स्वतःचे हक्काचे घर नाही, कामगार कायदयांची अंगलबजावणी होत नाही, त्यामुळे आता खूप वाट बघितली महापलिका प्रशासन आणि राज्यसरकार आम्हाला आमचे अधिकार देत नसेल तर आम्ही ते हिसकावून घेऊ हा इशारा देत आहोत असे विवेक पंडित यांनी ठणकावले.

मिरा- भाईदर क्षेत्रात येणारे २५ आदिवासी पाडे, तसेच शहरामध्ये अनेक गरीब वस्त्या आहेत . या वस्त्या व पाडे नागरी मुविधा पासून वंचित असून म. न.पा चे यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना नागरी सुविधा मिळाव्यात. ४७८ वन जमिनीचे आदिवासीचे दावे अजूनही
पालिका प्रशासनाकडून जिल्हा अधिकारी ठाणे यांना पाठविलेले नाहीत ते तात्काळ पाटवण्यात यावेत आणि वर्सावे या गावातील सर्व्हे नं .९0 क्षेत्र ८ गुंटे या जमिनीत असणारा गावकीचा तलाव म . न . पा. च्या दुर्लक्षामुळे चोरीस गेलेला आहे . तो तलाव शोधून दयावा. एकलव्य आदिवासी योसायटीच्या जागेतून म.न.पा.ने काढलेल्या बेकायदेशिर रस्त्याचे काम बंद करावे, मिरारोड येथील उद्यानासाठीच्या जागेच्या आरक्षण बदलाचा ठराव रद्द करावा, बी .एस .यु . पी योजने अंतर्गत मनपाने बेघर केलेल्या आदिवासी व गरीब कुटूंवाना तत्काळ घरकूलाचा लाभ दयावा . मनपा क्षेत्रातील गरीब दुर्बल घटकांना शिक्षणाचा हक्क व लाभ मिळावा तमेच मनपा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी या इशारा मोर्चाचे आयोजन केले होते.
काशिमिरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयाला हार घालून मोर्चाला सुरुवात करून चालत हा मोर्चा मिरा भाईदर महानगरपालिकेवर धडकला .
नागरी समस्या व कामगारांचे प्रलंवित प्रश्न न सूटल्यास यापुढे महानगरपालिकेत ठीय्या आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देण्यात आला. श्रमजीवी संघटनेच्या मोर्चाची सकारात्मक दाखल घेत पालिका आयुक्त श्री बालाजी खतगावकर यांनी संघटनेने मांडलेले प्रश्न प्राधान्याने आणि लवकरात लवकर सोडविणार असल्याचे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, उपकर्याध्यक्षा स्नेहा पंडित (दुबे), सरचिटणीस बाळाराम भोईर, श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुलतान पटेल, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्यासह मोठ्याप्रमाणात पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.