लॉकडाऊनमध्ये दोन चिमुरड्यांचे प्राण वाचवण्यात मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयातील डॉक्टरांना यश..!

0
518

मुंबई – योगेश चांदेकर:

एका लहानश्या खेड्यात राहणाऱ्या रियाना या एक वर्षांच्या मुलाने खेळता-खेळता एक रूपयांचे नाणं गिळले. या मुलाला मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी या मुलाच्या घशातून यशस्वीरित्या हे नाणे बाहेर काढलयं. दुबिर्णीद्वारे ही प्रक्रिया करण्यात आली आहे. आता या मुलाची प्रकृती उत्तम असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.
मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयातील नाक-कान-घसा शल्यचिकित्सक आणि सल्लागार डॉ. नीपा वेलिमुत्तम आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयातील नाक-कान-घसा शल्यचिकित्सक डॉ. नीपा वेलिमुत्तम यांनी सांगितले की, ‘‘काही दिवसांपूर्वी या मुलाने घरी खेळताना जमिनीवर पडलेले एक रूपयांचे नाणं चुकून गिळले. मुलाने नाणं खाल्ल्याचं लक्षात आल्यावर आई-वडिलांनी त्याला तातडीने वोक्हार्ड रूग्णालयातील आपत्कालीन विभागात आणलं. याठिकाणी रियानचा एक्स-रे काढला आणि उपचार सुरू केले. वैद्यकीय अहवालानुसार, गिळलेलं नाणं रियानची श्वसननलिका आणि अन्ननलिकेच्या मधोमध अडकली होती. नाणं अडकल्याने त्याला श्वास घेताना त्रास जाणवत होता. हे पाहून या मुलाला तातडीने शस्त्रक्रिया विभागात हलवण्यात आले आणि एन्डोस्कोपीद्वारे प्रक्रिया करून रियानच्या घशात अडकलेलं नाणं बाहेर काढलं. या प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी या मुलाला घरी सोडण्यात आले.’’

अजून एका प्रकरणात लहान मुलीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालयं. अमरिता ही चार वर्षांची चिमुरडी असून खेळता-खेळता तिने एक लोखंडी (धातू) तुकडा नाकात घातला. या मुलीलाही श्वास घेण्यास अडचण होत असल्याचं आई-वडिलांच्या लक्षात आलं. परंतु, लॉकडाऊनमुळे आजुबाजूच्या परिसरात कोणीही डॉक्टर नव्हते. मुलीची बिघडत चाललेली प्रकृती पाहून आई-वडिलांनी तिला लगेचच वोक्हार्ड रूग्णालयात दाखल केलं. याठिकाणी शस्त्रक्रिया करून या मुलीच्या नाकातून धातूचा तुकडा काढण्यात आला. डॉक्टरांच्या या प्रयत्नांमुळे ही मुलगी पुन्हा श्वास घेऊ शकतेय.
याबाबत पुढे बोलताना डॉ. डॉ. नीपा वेलिमुत्तम यांनी सांगितले की, ‘‘लहान मुलांना कळतं नसल्याने असे प्रकार घडतात. काही प्रकरणांत मुलांनी गिळलेल्या वस्तू आपोआप बाहेर येतील याची पालक वाट बघतात. त्यामुळे जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे मुलं ६ वर्षाचं होईपर्यंत पालकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. याशिवाय, असं काही घडल्यास वेळ न घालवता रुग्णालयात वेळीच पोहचणं महत्वाचं आहे.’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here