पालघर: अडथळ्यांची शर्यत पार करत आमदार सुनिल भुसारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

0
416

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुर्लोद, गोमघर, सुर्यमाळ या गावात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरातील अन्नधान्य भिजले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसाने सर्वांची एकच धांडेली उडाली. यामुळे या भागातील लोकांना कोरोनाबरोबरच नैसर्गिक संकटाशी देखील लढावे लागत आहे.

दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करण्याचा निर्णय आमदार सुनिल भुसारा यांनी घेतला खरा मात्र वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठी झाडे आणि विजेचे खांब कोसळल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांना अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ग्रामस्थांना दिलासा द्यायचा या उद्देशाने आमदार सुनिल भुसारा यांनी काही अंतर चालत तर काही अंतर दुचाकीवरून प्रवास करत पाहणी पूर्ण केली. झालेल्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर नुकसान ग्रस्तांना तात्काळ भरीव मदत देण्यासंबंधीच्या सुचनाही त्यांनी संबंधित प्रशासनाला केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here