MUMBAI e NEWS –
पालघर-योगेश चांदेकर :
औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये संपूर्ण महाराष्ट्र मधुन आलेल्या अनेक संघामधून आ. टी. आय. वाणगाव विभाग प्रतिनिधी क्रिकेट मध्ये विजेता ठरला. दि १६ व १७ जानेवारी रोजी कौशल्य विकास विभागातर्फे आयोजीत विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या.

यामध्ये खो खो, लांबउडी, उंचउडी, धावणे, क्रिकेट इ. सामने आयोजीत झाले. वेगवेगळया गटातील सामने जिल्हास्तरीय विभाग, राज्यपातळीवर खेळवण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांनी विशेष नैपूण्य दाखवून अप्रतिम विजय साकारला.यामध्ये प्राचार्य भोकरे यांनी विशेष मेहनत घेतली. मुंबई विभागाचे सहसंचालक जाधव तसेच वाणगाव आय. टी. आय चे प्रशांत बोकन यांनी प्रोत्साहन दिले. सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन सर्व स्तरावरून करण्यात येत आहे.
सांघिक स्पर्धा
क्रिकेट (मुले) मुंबई विभाग विजयी (आय टी आय वाणगांव ता.डहाणू जिल्हा पालघर)
व्हॉलीबॉल (मुले) मुंबई विभाग विजयी (आय टी आय रत्नागिरी)
खो खो (मुले)मुंबई विभाग विजयी (आय टी आय मुंबई-11)
वैयक्तिक स्पर्धा
वैशाली वसावले आय टी आय विक्रमगड जिल्हा पालघर 400 मीटर (मुली) प्रथम क्रमांक
संतोष शेलार आय टी आय रत्नागिरी 100 व 400 मीटर (मुले) प्रथम क्रमांक