मुंबई ई न्यूज IMPACT: अखेर विनापरवानगी शिबिर घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल..!

0
605

पालघर – योगेश चांदेकर

दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिक आणि त्रिमूर्ती रोडवेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरासाठी आरोग्य विभागाकडून पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांनी यासंबंधी बातमी करत या प्रकरणाचा भांडाफोड केला होता. संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्याने एकाच दिवसात प्राथमिक चौकशीअंती या शिबिरामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले.

याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाकडून डहाणू पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले असल्याने कलम 188 न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

मंदार धर्माधिकारी, उपविभागिय पोलिस अधिकारी डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here