मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन

0
388

मुंबई | मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे बुधवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

डॉ. अजय देशमुख यांनी 24 जानेवारी 2019 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते संचालक महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ या पदावर कार्यरत होते.  डॉ. देशमुख यांनी पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजीतून पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी पीएचडीही प्राप्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here