पालघर: प्रेमसंबंधातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या..!

0
395

पालघर – योगेश चांदेकर:

बोईसरच्या त्रिवेदिनगर येथील सरावली भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महेंद्र यादव नावाच्या इसमाने आपल्या पहिल्या पत्नीस चाकूने ठार मारले आणि त्यानंतर स्वतः रेल्वेपटरीवर आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमार्टमसाठी पाठविला असल्याचे समजते.

पालघरचे पोलिस सचिन नवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार “पतीचे दुसर्‍या एका महिलेशी प्रेमसंबंध होते आणि त्यावरून दोघे पती आणि पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असे. मंगळवारी रात्री उशीरा त्याने पहिल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर रेल्वेच्या खाली येऊन आत्महत्या केली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.” याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here