पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील अनेक लोक हे मीरा भाईदंर, वसई, नालासोपारा याठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास आहेत. त्यामुळे या गावातील अनेक घरे कायम स्वरूपी बंद आहेत. अशा सर्व बंद असणाऱ्या घरांची माहीती घेवुन ग्रा. पं. ने सदर घरांवर नोटीस लावत सर्व घरांना टाळे ठोकले आहे. सदर घरांमध्ये कोणी बाहेरील व्यक्ती येऊन राहू नये म्हणुन ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. सरपंच संतोष ढाक, उपसरपंच ब्रिजेश ठाकुर व ग्रामसेवक विपिन पिंपळे यांनी ग्रामपंचायतच्या या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे.

जिल्ह्याच्या सीमा बंद असताना चोरट्या मार्गांचा वापर करून अथवा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाहेर राहणारे लोक येण्याची भीती आहे असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले आहे. ग्रामपंचायतची परवानगी न घेता याठिकाणी राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच कोण विनापरवानगी राहताना आढळून आल्यास अथवा नोटीस फाडून टाकल्यास ग्रामपंचायत कडून पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.