MUMBAI e NEWS :
सामाजिक प्रश्नांची जाण ठेवणारं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सांगली जिल्ह्यातील अंजनी या आबांच्या जन्मगावी त्यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याला, विचारांना वंदन केलं. मनमिळाऊ स्वभावाच्या आबांनी कधीही कुणाचं मन दुखावलं नाही. राजकारणात राहून समाजसेवेत त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. अशा भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
सामाजिक प्रश्नांची जाण ठेवणारं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, अंजनीत त्यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि आदरांजली वाहिली. त्यांच्या कार्याला, विचारांना वंदन केलं. pic.twitter.com/MoTcw1oz1s
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 16, 2020