पालघर – योगेश चांदेकर:
पालघर तालुक्यातील बोईसर बेटेगाव येथील एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. सदर महिलेने मुंबईतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी दिले हिते. तिच्या संपर्कात 5 जण आले असून त्यांना क्वारंटाईन करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

पालघर ग्रामीण मधील रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. दरम्यान संपर्कातील पाचही जण त्याच महिलेच्या कुटुंबातील असून खबरदारीचा उपाय म्हणून ती महिला राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.