पालघर: डहाणूतील परिचारिकेला कोरोनाची लागण; संपर्कातील ४ जण क्वारंटाईन..!

0
385

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाकी येथील दहिसर येथे आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या परिचारिकेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे. सदर परिचारिका हि दहिसर येथे कार्यरत असताना ती कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिच्या स्वॅबचे नमुने खासगी लॅबमध्ये कोरोनासाठी देण्यात आले होते. सदर कोरोनाबाधित परिचारिकेला बोईसर येथील टिमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित परिचारिकेच्या अतिजोखमीच्या सहवासात आलेल्या तिच्याच कुटुंबातील ४ जणांना डहाणू तालुक्यातील आशागढ येथील संतोषी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्या ४ जणांचे स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. कोरोनाबाधित परिचारिकेच्या प्रवास इतिहासाद्वारे संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here