पालघर: त्या ५० वर्षीय इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह..!

0
460

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर शहरातील टेंभोडे गणेश नगर परिसरातील ५० वर्षीय इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीला SARI/ILI लक्षणे आढळल्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा इसम वेवूर घोलविरा येथे एका कंपनीमध्ये कामाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या या व्यक्तीच्या प्रवास इतिहासाची माहिती घेतली जात आहे. दरम्यान अतिजोखमीच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here