पालघर – योगेश चांदेकर:
कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कात आलेल्या 4 पोलीसांसह त्यांचे कुटुंबिय असे एकूण 15 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान काल कासा येथील 23 लोकांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते त्यातील 2 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर आणखी काही अहवाल प्रलंबित आहेत.
सदर कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी आयडियल हॉस्पिटल वाडा येथे दाखल करण्यात येणार आहे.