पालघर – योगेश चांदेकर :
पालघरमध्ये एका नवविवाहित जोडप्याने इतरांसाठी एक आदर्श ठेवला आहे. चर्चमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यानंतर त्यांनी वसई येथील कोविड रुग्णसेवा केंद्राला ५० बेड व दोन ऑक्सिजन सिलेंडर्स दान केले आहेत. Eric Lobo आणि Merlin Tuscano अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे लॉकडाऊनच्या सुरवातीपासूनच कम्युनिटी किचन व श्रमिक ट्रेन सारख्या प्रोजेक्टवर सरकारसोबत स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. ते काम करत असतानाच त्यांच्या लक्षात आले कि कोविड सेंटर मध्ये बेडची व ऑक्सिजन सिलेंडर्स कमतरता आहे.

म्हणून त्यांनी आपल्या लग्नाचा खर्च कोविड सेंटरसाठी देण्याचा ठरवला. त्यानंतर त्या दोघांनी तहसीलदार कार्यालयाकडून परवानगी घेऊन २० लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. लग्नावेळी आमदार क्षितीज ठाकूर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे व तहसीलदार किरण सुरवसे हे उपस्थित होते. लग्न झाल्यानंतर तरुणांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या दामप्त्याकडून ही देणगी स्वीकारली व त्या दोघांचे विशेष आभार मानले. उल्लेखनीय आहे की वसई-विरार हा पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनबाधित क्षेत्र आहे जिथे सुमारे दोन हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तेथील कोरोनाबाधित लोकांना बेड्स उपलब्ध झाले असून तेथील डॉक्टर व अधिकाऱ्यांनी त्या दोघांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एरीक व मार्लिन यांनी तरुणांना आवाहन केले आहे कि आपण सुद्धा अशा प्रकारे कोविड योद्ध्यांना मदत करून सरकार तसेच समाजाला मदत करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here