IMPACT: पालघरमधील खैर वृक्षतोड प्रकरण; वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून चौकशीचे आदेश

0
428

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील मौजे मेंढवन येथे कूप नंबर 191 व 207 मध्ये वनविकास महामंडळ यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खैर प्रजातीच्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याची एक्सक्लुजीव बातमी मुंबई ई न्यूजने केली होती. या बातमीची संजय राठोड, मंत्री (वने,भूकंप व पुनर्वसन) महाराष्‍‍‍ट्र राज्य यांनी तात्काळ दखल घेत ही बाब गंभीर असल्याचे मत व्यक्त केलं. तसेच
या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राम बाबू (व्यवस्थापकीय संचालक – वन विकास महामंडळ) व नरेश झुरमुरे (मुख्य वनसंरक्षक – ठाणे वनवृत्त) यांना दिले आहेत.

एकीकडे पर्यावरणाच्या ह्रासामुळे जागतिक तापमान वाढीची समस्या निर्माण झाली आहे. राज्य सरकारने शतकोटी वृक्षलागवड हि मोहीम देखील हाती घेतली होती. दुसरीकडे मात्र वन विरळीकरणाबाबतच्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवून वृक्षांची कत्तल केली जात आहे. याबाबतची बातमी मुंबई ई न्यूजने दिल्यानंतर या बातमीमुळे एकच खळबळ माजली होती. मुंबई ई न्यूजचे वरिष्ठ पत्रकार योगेश चांदेकर यांनी हे संपूर्ण प्रकरण लावून धरत याचा पाठपुरावा केला. दरम्यान तात्काळ दखल घेत याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याने ग्रामस्थांनी वनमंत्री संजय राठोड यांचे आभार मानले.

  • “वृक्ष तोडीची सदर घटना हि दुर्दैवी आहे, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राम बाबू यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” – संजय राठोड, मंत्री (वने, भूकंप व पुनर्वसन) महाराष्‍‍‍ट्र राज्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here