Good News: PM किसान योजनेची ‘फार्मर’ लिंक पुन्हा सुरू, अशी तपासा आपल्या नावांची यादी

0
476

नवी दिल्ली।देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून गेले काही दिवस बंद असलेली PM किसान योजनेची फार्मर लिंक पुन्हा सुरू झाली असून शेतकऱ्यांना आता त्यांचा हप्ता जमा झाल्याची माहिती ऑनलाईन तपासता येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना एप्रिलचा हप्ता पहिल्या आठवड्यात देण्याची घोषणा केल्यानंतर सरकारने युध्दपातळीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरवातही केली. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे पीएम किसान योजनेसंदर्भात अधिकृत वेबसाईटवर असणारा ‘फार्मर्स कॉर्नर’ मात्र गायब झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे स्टेटस तपासणे अवघड झाले होते. मात्र ४ दिवसानंतर आता पुन्हा ही वेबसाईट सुरळीतरित्या चालू झाली असून शेतकऱ्यांना आपल्या खात्यावर जमा झालेल्या हप्त्यांची इत्यंभूत माहिती मिळत आहे.

यासाठी शेतकऱ्याला त्याचा आधार क्रमांक दिल्यानंतर त्याच्या खात्याची संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर किती हप्त्याचे पैसे किती तारखेला जमा झाले याचा तपशील पहायला मिळत आहे. गेले काही दिवस ही वेबसाईट बंद असल्याने शेतकरी वर्गाची मोठी अडचण झाली होती. https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus/BeneficiaryStatus.aspx

फार्मर्स कॉर्नरवर शेतकऱ्यांना या सेवांचा लाभ मिळत आहे. 

  • पीएम किसान साठी स्वतः रजिस्ट्रेशन साठी – New Farmer Registraion
  • आधार अपडेट माहिती – Edit Aadhar failuar Record
  • शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची वैयक्तिक माहिती –BeneficiaryStatus
  • लाभार्थ्यांची यादी – Beneficiary List
  • स्वत: नाव नोंद केलेले/CSC वरून नोंद केलेले शेतकरी माहिती –Status of Self Registered/CSC Farmer
  • पीएम किसान मोबाईल अॅप – Download PM Kisan App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here