MUMBAI e NEWS :

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” हे पुस्तक भाजप कार्यालयातच प्रकाशित केल्याची गोष्ट समोर येताच जय भगवान गोयल व भाजपवर चहू बाजुंनी टीका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर चांगलाच हल्ला चढविला आहे. सध्या भाजपमध्ये असणारे जय भगवान गोयल हे आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरीत ऊललेख करून जय भगवान गोयल या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजां बरोबर केली हे भाजपात असलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

“निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सुर्य..एक चंद्र आणि एकच छत्रपती शिवाजी महाराज” असं ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी असं परखड मत व्यक्त केले आहे.

जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवाजी महाराज होणे नाही – जितेंद्र आव्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here