मुंबई – योगेश चांदेकर:
12 मे ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिना’निमित्त मीरा रोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यासाठी पारिचारिका दिवसरात्र झडटायेत. मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात ‘परिचारिका दिन’ साजरा करण्यात आला. सर्व परिचारिकांच्या कामाचे कौतूक करण्यासाठी रूग्णालयात परिचारिका दिन साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमात १०० हून अधिक परिचारिकांनी आवर्जुन हजेरी लावली होती.
सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढतोय. या विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या रूग्णांना उपचार देऊन त्यांना बरं करण्याचे काम डॉक्टर करत आहेत. या कामात डॉक्टरांसह परिचारिका पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावतायेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून रूग्णसेवा देता आहेत. या परिचारिकाच्या कामाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो.

मात्र, यंदा कोविड-19 च्या धास्तीमुळे मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात अत्यंत साध्यापद्धतीने हा दिन साजरा करण्यात आला. हा दिन साजरा करताना सोशल डिस्टसिंगची काळजी सुद्धा घेण्यात आली होती.
या रूग्णालयात खास परिचारिकांसाठी विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती यात चित्रकला, एकलनृत्य, गायन आणि वैयक्तिक क्विझ स्पर्धेचा समावेश होता. या स्पर्धेचा निकालही लगेचच जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत परिचारिका सोना बिजू यांना गाण्यासाठी प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तर द्वितीय पुरस्कार आथिरा आणि तृतीय पुरस्कार बेन्सी यांनी पटकावला आहे. तसेच नृत्याच्या स्पर्धेत लिजिमोल बिजू यांचा प्रथम क्रमांक आला आहे. तर अंजू लालू यांचा द्वितीय तर ज्योती आणि सोनल यांना तृतीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय चित्रकला स्पर्धेत नीथू यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तर शबाना यांना द्वितिय तर प्रिती सावंड आणि प्रिंसी तृतीय पुरस्कार मिळाला आहे. आणि क्विझ स्पर्धेत सबिता यांना प्रथम, शेरीन यांना द्वितिय तर रितू यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयातील नर्सेस प्रमुख लिसेमोल साजी म्हणाल्या की, “रुग्णालयातील सर्व परिचारिका आपल्या वैयक्तिक समस्या मागे ठेवून रूग्णसेवा देण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. आमची काळजी घेतल्याबद्दल आणि आपली सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल आम्ही रुग्णालयाचे आभार मानतो. आम्हाला आनंद होत आहे की, रुग्णालयाने आम्हाला तणावमुक्त करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले. आम्ही सर्व नर्सच्या वतीने हॉस्पिटलचे आभारी आहोत. आम्ही समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्यास उत्सुक आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत रूग्णांची सेवा करत राहण्याची आशा करतो. आम्ही एकजुटीने उभे राहून कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्याचे वचन दिले आहे.”
वोक्हार्ड रूग्णालयातील केंद्र प्रमुख डॉ. पंकज धामिजा म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळावधीत कोरोनाचं संकट वाढत असताना परिचारिका स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रूग्णसेवा देत आहेत. परिचारिका सामाजिक बांधिलकी जपत असल्याने मला याचा आनंद आहे.