पालघर मधील अनोखा साहेबप्रेमी तरुण; शरद पवारांचे चित्र रेखाटत झाला… चित्रकलेत निष्णात!

0
9266

पालघर – योगेश चांदेकर:

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये गेली कित्येक वर्षे आपल्या प्रभावी आणि लक्षवेधी कारकिर्दीने युवकांना आणि सर्वसामान्यांना कायमच प्रोत्साहित करणाऱ्या शरद पवार यांचा करिष्मा आजही कायम आहे. शरद पवार नावाची जादू अन त्याच वलय आजही चहू बाजूला विस्तीर्ण होत अनेक नव्या उमदीच्या तरुणांना आपल्या कवेत सामावून घेत त्याच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. राजकारणाच्या आखाड्यातील कसलेला मल्ल म्हणून शरद पवारांचा देशपातळीवर उल्लेख केला जातो तो उगाच नाही, याचा प्रत्ययही यंदाच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये अख्ख्या देशाने बघितला.

सत्तास्थापनेच्या घडामोडींमध्ये तर, त्यांनी जणू राजकीय कौशल्यच पणाला लावलं होतं. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये योग्य तो समतोल राखत घो़डदौड करणाऱ्या याच शरद पवार यांच्यासाठी कार्यकर्ते हरतऱ्हेच्या गोष्टी करण्यात आघाडीवर असतात.
यामुळेच ८० वर्षांचा तरुण योद्धा हि महाराष्ट्रातील तरुणांनी शरद पवारांना नवी उपाधी दिली.

अगदी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यासारख्या दुर्गम भागातील युवकाने त्यांच्या कार्यामुळे प्रभावित व्हावे इतकी या व्यक्तिमत्वाची ताकत आहे. हर्षवर्धन अशोक क्षीरसागर या सिव्हिल इंजिनियरिंग शेवट वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने फक्त शरद पवारांवरील प्रेमापोटी त्यांची चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली आणि आज तो त्या कलेत निष्णात बनला आहे. घरची प्रचंड गरीबी, वडील अशोक क्षीरसागर केस कर्तनालय चालवून कुटुंबाची उपजीवीका भागवतात. मुलगा हुशार असल्याने हालअपेष्टा सोसत त्याला चांगलं शिक्षण दिले. इतकंच नाही तर त्याने कला जोपासावी यासाठी ते वेळोवेळी प्रोत्साहित देखील करत असतात.

आत्तापर्यंत हर्षवर्धनने कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांचे चित्र रेखाटले आहे. यानंतर आता त्याचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे फोटो रेखाटण्याचे काम सुरू आहे. एक एक करत राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांची छबी कॅनव्हासवर रेखाटण्याचा त्याचा मानस आहे. त्याच्या या कलेचं मोखाडा तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here