पालघर (योगेश चांदेकर) :
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्तम आणि चांगल्या दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालघर जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कृषिनिविष्ठा केंद्राकडून बियाणे, खते, किटकनाशके यांचा पुरवठा केला जात असताना तो निकृष्ठ असणे, भेसळयुक्त असणे अथवा या निविष्ठाच बोगस असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून गुणवत्ता नियंत्रणच्या उद्देशाने आळा घालण्यासाठी पालघर जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. 

प्रत्येक तालुका स्तरावरवर देखील ही समिती कार्यान्वित राहणार असून या समितीमध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि विद्यापीठ/कृषिसंशोधन केंद्र/कृषि विज्ञान केंद्र यांचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी, कृषि अधिकारी पंचायत समिती यांचा समावेश आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here