पालघर – योगेश चांदेकर :-

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधीत करण्यात आले आहे. त्या करीता पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 1 ) ( 3 ) प्रमाणे मनाई आदेश पारित करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जिविताला, आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यासाठी स्थानिक, निवासी, अभ्यांगत, वारंवार कामानिमित्त पालघर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी डॉ शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली सायकल तसेच पारंपारीक व अपारंपारीक इंधनावर चालणाऱ्या ( गिअरसह / शिवाय ), सर्व प्रकारच्या तीनचाकी वाहने, हलकी वाहने, ॲप आधारीत ओला, उबर व तत्सम वाहने मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास ( रुग्णांची वाहतूक सोडून ) या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जिविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होऊ शकते. तसेच पालघर जिल्हयातील वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीमध्ये आढळून येणाऱ्या कोव्हीड -19 च्या रुग्णांची संख्या पाहता सदर आदेश लागू कारने आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

स्थानिक, निवासी, अभ्यागत, वारंवार कामानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या हद्दीचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला तसेच परदेशातून वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेल्या सर्व व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक / खाजगी ठिकाणी, परिसरातील रस्ते, हमरस्ते, सार्वजनिक मार्ग या ठिकाणी प्रवेश करणे, फिरणे, उभे राहणे, ताटकळणे, भटकणे तसेच कोणत्याही रस्त्यावर, पारंपारीक व अपारंपारीक इंधनावर चालणाऱ्या वाहनावर बंदी करण्यात आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांना यातून वगळण्यात आले आहे . सदर आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही .

        दुध, अन्न पुरवठा सेवा, अन्नधान्य, किराणा, चिकन, मटण, अंडी, मासे, फळे व भाजीपाला, पशु व पोल्ट्री खाद्य, मत्स्य खाद्य व कोलंबी खाद्य व त्याची वाहतूक (आवश्यक फलक लावून करावी ) हॉस्पीटल, मेडीसीन व फार्मास्युटीकल्स संबंधित सेवा, वैद्यकीय साहित्य (Medical Equipment) बँकींग व वित्तीय सेवा, विमान सेवा संबंधित सेवा, दुरध्वनी व संचार सेवा,  बंदर संबंधित सेवा, प्रसार माध्यमे संबंधित, विज, पेट्रोलियम, ऑईल आणि एनर्जी संबंधित,  पिण्याचे पाणी व पाणी पुरवठा  कृषी निविष्ठा विक्री केंद्रे व त्याची वाहतूक (आवश्यक फलक लावून करावी ) 

वरील सर्व बाबींशी संबंधित वेअर हाऊसिंग, पुरवठा साखळी (Supply Chain) IT Services (मर्यादित मनुष्यबळासह)वस्तू, माल व त्या संबंधित मनुष्यबळाची वाहतूक करणारी वाहने, पोलीस व आरोग्य विभाग तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधित वाहने (फक्त कर्तव्यार्थ), तातडीने रुग्णवाहतूक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टाफ, माझ्यावतीने व पोलीस अधीक्षक पालघर यांनी परवानगी/पासेस दिलेल्या व्यक्ती व वाहने. यांना बंदीतुन वगळण्यात आले आहे. सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यासाठी त्यांचे ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे रुग्णांनी सोबत बाळगणे आवश्यक करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here