पालघर – योगेश चांदेकर:
वाडा येथील संशयिताचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज 5 संशयिताचे घशातील नमुने मुंबई येथील कस्तुरबा गांधी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे, त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

विविध देशातून प्रवास करून आलेले 45 प्रवासी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते त्यापैकी 19 प्रवाशांचा निरक्षण कालावधी संपला असून त्यांना कुठला हि कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आलेले नाहीत. कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील महानगरपालिका सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी व खाजगी शाळा, अंगणवाडी आणि महाविद्यालय व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, यात्रा, जत्रा, दिंडी, पदयात्रा कीर्तन, भंडारा, सार्वजनिक सप्ताहा नागरिकांची गर्दी जमेल असे कार्यक्रम साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही, अशा कार्यक्रमांना यापूर्वी परवानगी दिली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत.

ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणारे कौटुंबिक खाजगी कार्यक्रम, लग्न समारंभ जिल्ह्यातील जनतेने आपली सामाजिक जबाबदारी समजून पुढे ढकलावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे आहे. आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित संस्था प्रमुखांना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहेत असेही जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

जनतेमध्ये भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये म्हणून व्यापक प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आजारासंबंधी प्रबोधनपर फलक, होर्डीग लावण्यात आले आहेत. केबल नेटवर्कद्वारे माहिती दिली जात आहे. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स, हॉटेल्स, बँक, एटीएम आदी ठिकाणे वारंवार निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सद्यस्थितीत शहर-जिल्ह्यात ‘करोना’चा एकही रुग्ण नाही. तरीही खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. कौटुंबिक कार्यक्रमांनाही सार्वजनिक रुप आणू नका, तसेच मंदिर अथवा देवस्थानाला जाताना योग्य ती काळजी घ्या’ घाबरू नका पण सतर्क रहा. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केल.

जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयं स्वयंस्फूर्तीने कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास नजीकच्या रुग्णालय मध्ये जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करावी तसेच कोरोना सदृश्य लक्षणे असलेली व्यक्ती आपल्याला आढळल्यास राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978086, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 104, पालघर जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक 02525252257, जिल्हा शैलेश चिकित्सक डॉ. कांचन वानेरे 9890906617. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, डॉ. स्मिता वाघमारे 9987240750, डॉ.तबस्सुम काजी 7720060519, डॉ भक्ती चौधरी 7720060478, डॉ.अब्दुल चौधरी 9579492341 या संपर्क क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here