पालघर: उपजिल्हा रुग्णालय कासा येथील संशयितांपैकी 149 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह

0
462

पालघर – योगेश चांदेकर:
उपजिल्हा रुग्णालय कासा येथील 2 कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यापैकी 150 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झालेआहेत. यापैकी 149 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर डहाणू तालुक्यातील सारणी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

उपजिल्हा रुग्णालय कासा येथील 2 कोरोना बाधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या 187 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 150 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून काही रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here