पालघर: बोईसरमधील वाईन शॉपसमोर लागल्या रांगा; जिल्ह्यातील तळीरामांच्या पदरी मात्र निराशाच!

0
355

पालघर – योगेश चांदेकर:

काल राज्यसरकारने सोशल डिस्टनिंग पाळण्याबरोबरच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत या अटीवर काँटेन्मेन्ट कोरोना झोन वगळता इतर ठिकाणी मद्यविक्री सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून अद्याप कुठलाच आदेश न आल्याने बोईसर मधील वाईनशॉप बंद आहेत. त्यामुळे अगदी सकाळपासूनच वाईन शॉपच्या बाहेर रांगेत उभा असलेल्या तळीरामांच्या पदरी निराशाच आली आहे.

बोईसर येथील वर्ड वाईन शॉप बाहेर भली मोठी रांग लागली आहे. दुकान उघडण्यापूर्वीच अगदी सकाळपासून सोशल डिस्टंसिंगचे नियम पळत लोक रांगेत उभे आहेत. काही लोकं हातात पिशव्या देखील घेऊन आले आहेत. याबाबत वाईन शॉप मालकांनी जिल्हाधिकारी यांचे आदेश आल्याशिवाय कोणतेही वाईन शाँप सुरू होणार नाहीत असे सांगितले तरी लोक रांगेतच उभे आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार याकडे या रांगेत उभारलेल्या तळीरामांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here