MUMBAI e NEWS –
पालघर-योगेश चांदेकर :
संपूर्ण जगाचे ज्याकडे लक्ष असते अशी आशियातील सर्वात मोठी अशी १७ वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. या स्पर्धेमध्ये देश विदेशातील तब्बल ५५ हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. यावर्षीही इथिओपियाच्या स्पर्धकांनी आपले वर्चस्व कायम राखले. ज्यामध्ये देरारा हुरीसाने २ तास ८ मिनिटे ८ सेकंद अशी वेळ नोंदवत ४२ किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

४२ किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बांद्रा रेक्लमेशन अशी ४२.१९५ किलोमीटर मॅरेथॉन ४ तास ४१ मिनिटे २७ सेकंद वेळेत पूर्ण केली. डॉ. शिंदे यांनी मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या एकूण ७८०३ धावपटूंमधून २६५३ स्थान, पुरुष गटातील ७११३ धावपटूंमधून २४९६ स्थान तसेच ५० ते ५४ पुरुष वयोगटातील ६६४ धावपटूंमधून १९३ वे स्थान पटकावले.

जीवनशैलीतील बदलांमुळे ताणतणावात वाढ होत आहे. त्याचेच विपरीत परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दिसत आहेत. बहुतांश नागरिकांमध्ये आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत सजगता दिसून येत नसल्याने आपले आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपली तंदुरुस्ती ही तितकीच महत्त्वाची आहे. शारीरिक स्वास्थ्य टिकवून निरोगी जीवन जगता यावे, तरुणांनी व मुलांनी प्राधान्याने मैदानी खेळ खेळावेत, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी यानिमित्ताने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here