पालघर जिल्हा कोरोना अपडेट; १५० रुग्ण, १० मृत्यू, एकूण २७३७ संशयितांची तपासणी

0
438

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना विषाणूचा प्रसार पालघर जिल्ह्यात झपाट्याने होत असल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हॉटस्पॉट क्षेत्रांचा समावेश प्रतिबंधीत क्षेत्रात केला आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रात प्रवेश करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. सद्यस्थितीला २८ एप्रिल सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार पालघर १५, डहाणू- ८ , वसई ग्रामीण – १ व वसई – विरार महापालिका १२६ अशी रुग्णांची एकूण संख्या १५० आहे. तर १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजवर २७३७ संशयितांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी २४०८ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह तर १५० जणांना कोरोना लागण झाली आहे तर अद्याप १७९ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

करोना विषाणूचा (कोव्हिड-19) चा संसर्ग वाढीस लागलेला असून आजपर्यंत १५० रुग्ण बाधीत झाले आहेत त्यापैकी १० जणांचा मृत्यू झालेला असून बाधीतांची संख्या वाढत चालली आहे. सदरचा साथरोग संसर्गजन्य असून बाधितांची संख्या आटोक्यात यावी यासाठी बाधित रुग्ण ज्या प्रभाग, विभागात आढळून आलेले आहेत, असे प्रभाग, विभाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेले असून आरोग्य विभागामार्फत बाधित क्षेत्र व प्रतिबंधीत क्षेत्र आणि लोकसंख्या व घरांची संख्या यांच्या अनुषंगाने २१ ठिकाणे प्रतिबंध क्षेत्र ठरविण्यात आलेली आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020 चा नियम 100(आ) नुसार जिल्हयाच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या घोषित केलेले व भविष्यात घोषित करण्यात येणाऱ्या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती खेरीज अन्य कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांना सदर क्षेत्राच्या बाहेर पडण्यास अथवा बाहेरील व्यक्तीस आत येण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच सदर क्षेत्रामधील कोणत्याही सार्वजनिक खाजगी ठिकाणी, परिसरातील रस्ते, हमरस्ते, सार्वजनिक मार्ग या ठिकाणी प्रवेश करणे, फिरणे, उभे राहणे, ताटकळणे, भटकणे, पाळीव प्राण्यांना फिरविण्यास मनाई करणारा आदेश दिनांक 16/04/2020 रोजी रात्री 12.01 ते दिनांक 03/05/2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्वतचे दरम्यान लागू करत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) नूसार मनाई आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नूसार कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.


पालघर जिल्ह्यातील ग्रामीण प्रतिबंधित क्षेत्र पुढील प्रमाणे:

  • मौजे बोईसर, ता. पालघर
  • मौजे उसरणी, ता.पालघर
  • मौजे काटाळे, ता.पालघर
  • मोजे. दसरापाडा, गंजा, ता. डहाणू
  • मौजे कासा, ता. डहाणू
  • मौजे रानशेत सारणी ता. डहाणू
  • प्रतिबंधित करण्यात आलेलेक्षेत्र
  • सफाळे-डोंगरी, सफाळे, उंबरपाडा, कर्दळ या गावाचे क्षेत्र
  • उसरणी, दांडा,खटाळी या गावाचे क्षेत्र
  • काटाळे, लोवरे, वाकडी, वसरोली, वांदिवली, खरशेत, मासवण, निहे या गावाचे क्षेत्र,
  • दसरापाडा, गंजाड, महालपाडा या गावाचे क्षेत्र
  • कासा गावठाण, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, मातेरापाडा, विठ्ठलनगर, गायकवाडपाडा, काटकरपाडा, घाटाळपाडा या गावाचे क्षेत्र
  • भोईरपाडा, वरखंडपाडा, वाकीपाडा, सारणीफाटा,सारणी, डोगरीपाडा, करवटापाडा, गावठाणपाडा, मानीपाडा

वसई विरार शहर महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone)चे नाव पुढील प्रमाणे:

गोकुल टाउनशिप, विरार (पश्चिम) हनुमान नगर, नालासोपारा (पश्चिम) आनंदनगर, वसई (पश्चिम) सेंट्रल पार्क नालासोपारा (पूर्व) धानिव बाग, नालासोपारा (पूर्व) यशवंत विवा टाउनशिप, नालासोपारा (पूर्व) एम बी.इस्टेट, विरार (पश्चिम) साई नगर, वसई (पश्चिम) दत्तनगर, नालासोपारा (पूर्व) डॉन लेन, नालासोपारा (पूर्व) रहमत नगर, नालासोपारा (पूर्व) पापडी, वसई (पश्चिम) जगन्नाथ नगर, वसई (पूर्व) उमेळमान वसई (पूर्व) गावड निवास, विरार (पूर्व) भंडारपाडा, विरार (पश्चिम), कासारपाडा, वसई (पूर्व), मिनानगर, वसई(पश्चिम), गुलमोहर हाईट्स विरार (पश्चिम) वाय. के. नगर विरार (पश्चिम), गासगाव गाव, नालासोपारा (पश्चिम), पुरा आगाशी-चाळपेठ रोड प्रगति नगर, नालासोपारा (पूर्व) फुलपाडा, विरार (पूर्व), विना सरस्वती वसई (पूर्व) मधुबन, वसई (पूर्व) लक्ष्मी नगर, नालासोपारा (पूर्व) राजोडी, नालासोपारा (पश्चिम) एव्हरशाईन सिटी, वसई (पूर्व) निळेगांव, नालासोपारा (पश्चिम) पुरापाडा, विरार (पश्चिम)

गिरिराज कॉम्प्लेक्स, विनी रेसिडेन्सी, अरिहंत ज्योत, सेंट्रल पार्क, नासीम चाळ, दरबीस बिल्डींग, अकसर अपार्टमेंट ,के.टी.हामांनी, नवदुर्ग अपार्टमेंट, दोहा नगर, बोरी कॉलनी, रम्मा अपार्टमेंट, पापडी, बालाजी अपार्टमेंट, वरद विनायक विल्डीग, गावड निवास, नारंगी, बाबजी अपार्टमेंट, सावित्री बरफ चाळ, मरबाळ ए. आर. के. कॉ, ऑफ, हा. सोसायटी, गुलमोहर कॉम्लेबजक्स, श्रीवल्लभ दर्शन सोसायटी, टाकीपाडा, गुरुकृपा अपार्टमेंट, गोविद स्मृती अपार्टमेंट, विना सरस्वती अपार्टमेंट, मधुबन टाऊनशिप, शंकर राव नगर चाळ, राजोडी गांव, दत्तात्रय टॉवर, अक्षर भवन, आशिर्वाद अपार्टमेंट, पुरापाडा, आगाशी-चाळपेठ रोड

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील Containment Zone ची माहिती https://vveme.in/vvmc/corona/local host/backp/containment.html या लिंकवर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here