पालघर – योगेश चांदेकर:

देशभरात कोरोनाचं संकट वाढत असताना अनेक लोकांकडून पंतप्रधान रिलीफ फंडास आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शक्य तितकी रक्कम दान करण्यात येत आहे. अनेक मंदिरांनी देखील आपल्या दानपेट्या कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी खुल्या केल्या आहेत. डहाणू तालुक्यातील श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5 लाखांचा निधी दिला आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट कडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुवारी 5 लाखाची मदत “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19” या खात्यात ऑनलाईन पैसे भरून केली आहे. महालक्ष्मी मंदिर ट्रस्टकडून वर्षभर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here