पालघर । कोरोना संबंधी ‘त्या’ अफवा पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

0
422

पालघर/विक्रमगड – योगेश चांदेकर
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगभरातील विविध शास्त्रज्ञ या विषाणूवर लस आणि औषधाकरिता दिवसरात्र संशोधन करत असताना त्यावर अजूनही ठोस औषध सापडलेलं नाही. संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे भीतीच्या सावटाखाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. प्रशासन २४ तास अलर्ट आहे, मात्र अशापरिस्थितीत हि अनेक जण कोरोना विषाणूवर औषध असल्याचा दावा करून अफवा पसरवू लागल्याच्या घटना पुढे येत आहेत.


पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातील सारशी या गावात राहणाऱ्या शशिकांत विजयनाथ पांडे नावाच्या इसमाने कोरोना विषाणूवर उपाय असल्याचा दावा केला आहे. अमुक एका वनस्पतीच्या वेलीचा रस प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि करोना पूर्णपणे बरा होतो असा दावा करणारा व्हिडिओच त्याने सोशल मीडीयावर टाकला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा प्रकार त्या इसमाच्या चांगलाच अंगलट आला आहे. सदर वनौषधी उपचाराने कोरोना बारा होतो असा कोणताही आधार नसताना समाजात अफवा, गैरसमज पसरविल्याने शशिकांत पांडे याच्या विरोधात विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोरोना संबंधी केंद्र व राज्य सरकार अधिकृत व्यक्तीखेरीज सोशल मीडियावर कोणीही मेसेजेस निर्माण करून पाठवण्यावर कडक निर्बंध घातलेले आहेत. असे असताना देखील अनेकजण शासनाच्या आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here