पालघर – योगेश चांदेकर:
स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी तसेच सामान्य नागरिकांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर डहाणू लोकल सुरु होण्यासाठी प्रयत्न केले या त्यांच्या लढ्याला यश मिळाले. सरते शेवटी उच्च न्यायालयाने एका जनहीत याचिकेवर सुनावणी देत डहाणूपर्यंत लोकल सेवा सुरु करण्याचे आदेश दिले. लोक रेट्यापुढे नमते घेत रेल्वे प्रशासनाने १६ एप्रिल २०१३ रोजी पहिली लोकल डहाणू पर्यंत धावली. आज या घटनेला ७ वर्ष उलटून गेली असली तरी हा लढा प्रत्येक लढवय्याच्या मनात जिवंत आहे. आज भारतीय रेल्वेला देखील 167 पूर्ण झाली आहेत.

टप्प्याटप्प्याने करत रेल्वे प्रशासनाने डहाणू ते वैतरणा क्षेत्रात सरासरी एक तासांनंतर एक गाडी अशी वारंवारता ( frequency ) सध्या ठेवली आहे. मुंबई उपनगरीय क्षेत्रात सगळ्यात लांबचा पल्ला धावणारी लोकल तसेच देशातील सर्व उपनगरिय गाड्यांमधे सगळ्यात जलद गतीने धावण्याचा मान पहिल्यांदा आपल्या डहाणू लोकलला मिळाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांची संख्याही कमी पडत आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रात लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने डहाणू लोकलला लागलेले साईडींगचे ग्रहण हा प्रवाशांच्या चिंतेचा विषय बनला असून जोपर्यंत आपल्या विभागाचे वलसाड येथे असलेले नियंत्रण मुंबईतून केले जावे.

“डहाणू लोकल सुरु होऊन ७ वर्ष झाली असली तरी प्रवाशांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून ह्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे करत असून अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.
वलसाडचे नियंत्रण कक्ष मुंबईत हलविणे तसेच डहाणू ते विरार मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करणे ह्या संस्थेच्या मागण्या जर पुर्ण झाल्या तर प्रवाशांना खुप मोठा दिलासा मिळेल.” – हितेश सावे (जनसंपर्क अधिकारी, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था)

“डहाणू लोकलला आज ७ वर्षे झाली, हजारो लोकांचे स्वप्नं पूर्ण झाले पण आजही डहाणूकर प्रवासी उपेशीतच आहे. वलसाड येथून अनाकलनीय अधिकाऱ्यांमुळे गाड्या सायडिंगला निघण्याचे वाढत चाललेले प्रमाण चिंताजनक आहे. मुंबईहून सुरतपर्यंत प्रवासी वेळेवर पोहचू शकतो पण डहाणूकर वेळेवर पोचू शकेल का ह्याची शाश्वती नाहीये.”- हिमांशू वर्तक (सल्लागार- पालघर स्थानक समिती व कार्यकारिणी सदस्य, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here